चकमकीत सैन्याने केला 9 दहशतवाद्यांचा खात्मा
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानी लष्कराच्या मियांवली प्रशिक्षण हवाई तळावर शनिवारी पहाटे दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी लष्कराने वेळीच सावध होत दहशतवाद्यांचे कारस्थान हाणून पाडले. यावेळी लष्कराने केलेल्या कारवाईत 9 दहशतवादी मारले गेल्याचे पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने स्पष्ट केले आहे. तेहरिक-ए-जिहाद पाकिस्तानने (टीजेपी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
पाकिस्तानच्या मियांवली हवाई दलाच्या तळावर शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याने खळबळ निर्माण झाली. एअरबेसजवळ गोळ्यांचे आणि स्फोटांचे मोठे आवाज ऐकू येत होते. अनेक आत्मघाती हल्लेखोरांसह जोरदार सशस्त्र जिहादींनी हा हल्ला केला होता. त्यानंतर सतर्क लष्करी जवानांनी दहशतवाद्यांना तोडीस तोड उत्तर दिले. एअरबेसवरील हल्ला हाणून पाडण्यात आला. चकमकीत 9 दहशतवादी मारले गेल्याची पुष्टी लष्करी प्रवक्त्याने केली आहे. तेहरिक-ए-जिहाद पाकिस्तानने (टीजेपी) प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात पाकिस्तानमधील मियांवली प्रशिक्षण एअरबेस हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही संघटना तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) सारखीच आहे.









