इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या खैबर जिल्ह्यातील अकाखेल भागात दहशतवाद्यांनी सैनिकांना लक्ष्य करत मोठा हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यात तीन सैनिक मृत्युमुखी पडले असून अन्य 5 सैनिक जखमी झाल आहेत. तसेच 15 सैनिक बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. या सैनिकांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले असल्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांनी मंगळवारी सकाळी सुरक्षा चौकीवर आरपीजी, ग्रेनेड आणि स्वयंचलित शस्त्रास्त्रांनी हल्ला केला. हा हल्ला टीटीपीने घडवून आणला असावा असे सुरक्षा अधिकाऱ्यांचे मानणे आहे. अकाखेल क्षेत्राला टीटीपीचा बालेकिल्ला मानले जाते.









