सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मळेवाड शाखेच्या ए.टी.एम् सेंटरचे लोकार्पण जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते सोमवार, दि. ३ मार्च २०२५ रोजी सकाळी ९.३० वा. होणार आहे. या सोहळ्यास उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक गजानन गावडे, महेश सारंग, विद्याधर परब, रविंद्र मडगावकर तसेच मळेवाड ग्रामपंचायत सरपंच सौ. मीनल पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, मळेवाड विकास सेवा सोसायटी अध्यक्ष प्रकाश पार्सेकर, आजगांव विकास सेवा सोसायटी अध्यक्ष एकनाथ नारोजी, वेतोबा विकास सेवा सोसायटी अध्यक्ष सखाराम ठाकूर उपस्थित राहणार आहेत. या ए.टी.एम शुभारंभ लोकार्पण सोहळ्यास ग्राहक, ठेवीदार तसेच मळेवाड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले आहे .









