ईडीच्या छाप्यात लाखेंच्या रोकडसह महत्त्वाचे पुरावे जप्त
वृत्तसंस्था/ लखनौ
दिवंगत माफिया अतिक अहमदशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाकलेल्या छाप्यात झडतीदरम्यान रोख रक्कम, कागदपत्रे, उपकरणे आणि इतर पुरावे जप्त केले आहेत. छापे टाकण्यात आलेल्यांमध्ये प्रसिद्ध बिल्डर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट्सचा समावेश आहे. ईडीने बुधवार-गुऊवारी प्रयागराज, लखनौ आणि दिल्लीतील 10 ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईत 17.80 लाखांची रोकड, मालमत्ता खरेदी-विक्रीची कागदपत्रे, कंपन्या आणि कंपन्यांची आर्थिक कागदपत्रे, बँक स्टेटमेंट, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर भौतिक व इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. ईडीकडून जप्त केलेल्या पुराव्यांचे भौतिक आणि फॉरेन्सिक विश्लेषण सुरू आहे.
अतिक अहमद आणि त्याच्या साथीदारांवर अपहरण, खंडणी आणि प्राणघातक हल्ला असे आरोप ठेवण्यात आले होते. ईडीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे अतिक अहमद आणि त्याच्या साथीदारांविऊद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायदा, 2002 च्या तरतुदींनुसार तपास सुरू केला. यावषी एप्रिलमध्येही अतिकच्या जवळच्या नातेवाईकांच्या घराची झडती घेण्यात आली होती.









