सातार्डा : प्रतिनिधी
सातार्डा येथील आर सी सी आयोजित फुटबॉल स्पर्धेत अथर्व स्ट्रायकर संघाने रवळनाथ बॉईज , संघाला पॅनल्टी शुटआऊटवर नमवून प्रथम विजेतेपद पटकावले. या स्पर्ध्येत पाच संघांनी सहभाग घेतला होता.सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र घाडी, गोटया राऊळ,सर्वेश पेडणेकर, समीर राऊळ,देवेंद्र राऊळ यांनी संघ प्रायोजित केले होते.प्रथम विजेत्या अथर्व बॉईज संघाला माजी सरपंच उदय पारिपत्ये पुरस्कृत रोख पारितोषिक व सामाजिक कार्यकर्ते आपा राऊळ पुरस्कृत आर सी सी चषक देण्यात आला.उपविजेत्या रवळनाथ बॉईज संघाला ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ, भाऊ मांजरेकर पुरस्कृत रोख पारितोषिक व सामाजिक कार्यकर्ते रवि धूपकर पुरस्कृत चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील उत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून सुशांत वेंगुर्लेकर, उत्कृष्ट स्ट्रायकर गौरव पार्सेकर, उत्कृष्ट डिफेन्डर आर्यन गोवेकर, उदयन्मुख फुटबॉलपटू मेलवीन फर्नांडिस यांना पारितोषिके देण्यात आली.स्पर्धेचे बक्षीस वितरण ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ, भाऊ मांजरेकर, मंडळाचे कार्यकर्ते अर्जुन सातार्डेकर, यतीन घाडी, रामचंद्र घाडी, शुभम आसोलकर,पंकज बागकर, शुभम पिळणकर,अमृत घाडी, नंदू सातार्डेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.









