सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील डेगवे मोयझरवाडी येथील अथर्व अजय देसाई (20) याचे नुकतेच गोवा येथे निधन झाले. अथर्व गोव्यातील मोठ्या कॉलेजात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. त्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई,वडील,भाऊ आजोबा,आजी,चुलत भाऊ,बहीणी असा मोठा परिवार आहे. डेगवे येथील सरस्वती चुडे देसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि देवस्थानचे मानकरी प्रेमानंद देसाई यांचे ते नातू होय .









