गृहलक्ष्मी योजनेच्या नोंदणीसाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरून अथणी तालुक्यातील अवरखोड येथील ग्राम वन केंद्राला टाळे ठोकण्यात आले.
अवरखोड येथील ग्राम वन केंद्रात गृहलक्ष्मी योजनेच्या नोंद करण्यासाठी नागरीकांकडून पैसे उकळण्याचा तक्रारी आल्यामुळे तहसीलदार आणि महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी छापेमारी करून ग्राम वन केंद्राला टाळे ठोकले. संबंधित ग्राम वनच्या संचालकावर अथणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









