१ जानेवारी रोजी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी शहरातील उज्वल नगर आणि अमन नगरला भेट देऊन परिसराची पाहणी केली.या प्रसंगी त्यांनी जनता दरबाराचे आयोजन करून त्या–त्या भागातील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. या परिसरात गटारी आणि इतर प्रकल्पांचे काम सुरू केले आहे. उज्वल नगरमधील काही भागांना चांगल्या रस्त्यांची व पाण्याची योग्य पाइपलाइनची गरज आहे. कारण हा परिसर नुकताच विकसित झालेला आहे.आपल्या या भेटी दरम्यान आमदार आसिफ सेठ म्हणाले आता एक नवीन वर्ष सुरू झाले आहे. आणि शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि बेळगावच्या जनतेची सेवा करण्याचा माझा संकल्प आहे. या भागात पायाभूत सुविधांची वानवा होती. प्रत्येकाला या सुविधा मिळाव्यात.असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या पाहणी दरम्यान परिसरातील नगरसेवक,संबधीत अधिकारी आणि बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









