40 व्या वर्षापर्यंत मॅराथॉन मधील सहभाग योग्य
कधीकधी वाढत्या वयावरून चिंता निर्माण होऊ लागते. परंतु वैज्ञानिकांनुसार वय वाढण्यासोबत जीवन सुलभ होत जाते. विचार करण्याचे कौशल्य आणि पॅटर्न एकाच वयात सर्वोत्तम स्थितीत नसतात. किशोरवयीनांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा असू शकते, परंतु प्रौढांकडे सर्वात चांगली शब्दावली, रचनात्मकता आणि समस्यांवरील तोडग्यासाठी सर्वोत्तम कल्पना असते. 50 वर्षे वय हे क्रिटिकल अॅनालिसिससाठी सर्वोत्तम असते. हार्वर्ड आणि बोस्टन अटेंशन अँड लर्निंग लेबोरट्रीने प्रभावशाली अर्थतज्ञ, वैज्ञानिक आणि मनोवैज्ञानिकांच्या विस्तृत साखळीचे नवे संशोधन आणि सखोल विश्लेषणानंतर हे निष्कर्ष काढले आहेत. आमचे शरीर प्रारंभिक काळात अपार ऊर्जा लागणाऱ्या कामासाठी सर्वोत्तम स्थितीत असते. धावणे, स्केटिंग आणि पोहणे हे बळकट स्नायूंवर निर्भर असते. वय वाढण्यासोबत स्नायूंचे फायबर्स कमकुवत होऊ लागतात, यामुळे वेगाने धावणे किंवा पोहणे अवघड ठरते. याचमुळे उच्च ऊर्जायुक्त क्रीडा प्रकारांसाठीचे सर्वोत्तम वय 20-30 वर्षे आणि मॅराथॉन, नौकानयन यासारखे सहनशक्ती लागणारे खेळ वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत उत्तरप्रकारे पूर्ण करता येतात. रचनात्मकता, अॅथलेटिक कौशल्य आणि कल्पनाशीलता अनेकदा युवांशी निगडित असते. परंतु संशोधनातून वृद्ध लोक ‘प्रयोगात्मक’ विचारात सर्वात कुशल असल्याचे समोर आले आहे. अनेक वर्षांपासून संचित ज्ञान, शिक्षण आणि अनुभव हे इत्यादी वृद्धांच्या विचारशक्तीतून दिसून येते. त्यांचे कौशल्य 50-55 वर्षांदरम्यान पीकवर असते. आउट ऑफ बॉक्स विचार अन् विविध स्थितींसाठी अनुकूल सर्व शक्यता निर्माण करण्यास ते त्या वयात सक्षम असतात.









