प्रतिनिधी /फोंडा
फर्मागुडी-ढवळी बगलमार्गावर मालवाहू कंटेनरने दुभाजकावर धडक दिली. दुभाजकाच्या धडकेत कंटेनरचा पुढील टायर फुटला, सुदैवाने चालक व क्लिनर किरकोळ जखमावर बचावले. सदर घटना काल सोमवारी सायंकाळी 4 वा. च्या सुमारास घडली.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवाहू कंटेनर एमएच 43 यू 6926 मुंबईहून पणजीमागें वेर्णा येथे जात असताना ढवळी-फर्मागुडी बायपासच्या जीव्हीएम सर्कलच्या उतरणीवर हा अपघात घडला. उड्डापुलावरील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा गेल्याने सरळ दुभाजकावर जाऊन स्थिरावला. वाहनाची वर्दळ कमी असल्याने मोठा अपघात टळला. अचानक पंटेनरचा ब्रेकमध्ये व सटेअरिंगमध्ये बिघाड झाल्याचे चालकाने म्हटले आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून हवालदार महेश गावकर अधिक तपास करीत आहे.









