प्रतिनिधी /आमोणे
प्रतिवर्षाप्रमाणे आमोणे येथील श्री पूर्वस बेताळ मंदिरात वडील मायेचा सुखवास म्हणजे चार दिवसांच्या दाळपाचा रात्री होणार उत्सव बुधवारी सुरू होऊन शनिवार दि. 17 रोजी त्यांची सांगता होणार आहे. या उत्सवाचा प्रमुख भाग म्हणजे भक्तगण, भाविकांना कौल हा असून आज शनिवार दि. 17 रोजी रात्री 10.30 वा. दाळपाला प्रारंभ होईल. सुरुवातीला गाऱहाणे झाल्यावर येथील स्थानिक जाणघाडी घडी घालून सर्व देवांना चौकात येऊन प्रतिवर्षाप्रमाणे ‘राखणेचा शब्दाची आळवणी केल्यावर तेथे बेताळाचा अवसर येऊन सर्वांना परंपरेप्रमाणे कौल देईल. या कौलास सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सदर देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.









