व्यवहार 194 कोटीमध्ये होण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पीव्हीसी पाईप आणि प्लास्टीक उत्पादक ऍस्ट्रलने 194 कोटी रुपयांमध्ये जेम पेंट्सची जवळपास 51 टक्के हिस्सेदारी घेण्याचे निश्चित केले आहे. आगामी काळात पेंट व्यवसायामध्ये या योगे आपला वाटा वाढवण्यासाठी कंपनी प्रयत्न करणार आहे. ऍस्ट्रलने भागीदारी करण्यासाठी करार करण्यात आल्याची माहिती आहे.
यासोबतच कंपनीच्या संचालक मंडळाने व्यवहाराला मंजुरी दिल्यानंतर जेम पेंट्स आणि समभागधारकांसोबत एक निर्णायक करार केल्याचे सांगितले आहे. ऍस्ट्रलने म्हटले आहे, की संपूर्ण व्यवहार रोखीने करण्यात येणार असून सुरुवातीला 194 कोटी रुपयाची गुंतवणूक जेम पेंट्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये करणार आहे.
व्यवसाय वृद्धीसाठी वापरणार रक्कम प्राप्त होणाऱया रक्कमेतून व्यवसाय विकास साधला जाणार आहे. ऍस्ट्रलने म्हटले आहे, की जेम पेंट्सची अन्य 49 टक्के इक्विटी हिस्सेदारी खरेदी होणार आहे









