वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
इंग्लिंड प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेत अॅस्टोन व्हिला फुटबॉल क्लबने गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळवण्याची संधी वादग्रस्त व्हिएआर निर्णयामुळे गमवली. शुक्रवारी येथे झालेल्या सामन्यात अॅस्टोन व्हिलाला शेफिल्ड युनायटेडने 1-1 असे गोल बरोबरीत रोखले.
या संपूर्ण सामन्यात अॅस्टोन व्हिलाने आपले वर्चस्व राखले होते. सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना शेफिल्ड युनाटेडच्या कॅमेरून आर्चरने गोल केला. सामन्याच्या निर्धारित कालावधीमध्ये सात मिनिटे जादा देण्यात आली होती. या जादा कालावधीमध्ये अॅस्टोन व्हिलाच्या निकोलो झेनीओलोने गोल नोंदवून शेफिल्डला बरोबरीत राखले. या सामन्यामध्ये व्हीएआरचा वापर करण्यात आला होता. सामन्याच्या पूर्वार्धात अॅस्टोन व्हिलाला दोन पेनल्टी मिळाले होते पण व्हीएआरने ते नाकारले. हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिल्याने अॅस्टोन व्हिलाला या स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळू शकले नाही. सध्या लिव्हरपूल आणि अर्सेनेल हे संयुक्त पहिल्या स्थानावर आहेत.









