सावंतवाडी प्रतिनिधी
सन २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता परीक्षेमधून सहाय्यक सरकारी अभियोक्ता महाराष्ट्र राज्य ( वर्ग १ ) पदी आरती पवार यांची निवड झाली होती. त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी आरती पवार यांनी सिंधुदुर्ग येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे कार्यालयात सहाय्यक लोकअभिरक्षकपदी काम पाहिले आहे. आता त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून काम पाहणार आहेत.
Previous Articleरेल्वे स्टेशनवर होणार आणखी दोन एक्सलेटर अन् दोन लिप्ट
Next Article येळ्ळूर येथे उद्या साहित्यिकांची मांदियाळी









