Satara Crime News : परमिट रूमच्या माध्यमातून अवैधरिता दारूची केलेल्या वाहतुकीतील गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची लाख स्वीकारताना औंध तालुका खटाव येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांना लाज लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे आणि पोलीस निरीक्षक बापूसाहेब नारायण जाधव (वय -54) या दोघांना पकडले. घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, औंध येथील एका व्यक्तीचे परमिट रूम असून त्यामधून संबंधित व्यक्तीने अवैधरीच्या दारूची वाहतूक केल्यामुळे त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात संबंधित व्यक्तीला दाखल असणाऱ्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व त्यातून पुढे व्यवसायात पुढे कोणताही त्रास न देण्यासाठी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे आणि पोलीस निरीक्षक बापूसाहेब नारायण जाधव या दोघांनी संबंधित व्यक्तीकडे दीड लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती.तडजोड करत एक लाख रुपये देण्याचे ठरले. संबंधित व्यक्तींनी याबाबतची तक्रार सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पथकाने औंध येथील जुना बाजार पटांगणावर सापळा रचला.या सापळ्यात एक लाख रुपये स्वीकारताना पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे आणि पोलीस निरीक्षक बापूसाहेब नारायण जाधव या दोघांना पथकाने रंगेहात पकडले.









