सोलापूर नांदेड येथील बिलोली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले आनंद माळाळे यांनी आज शनिवार 7 ऑक्टोबर रोजी पहाटे सोलापुरातील राहत्या घरी सव्हिॅस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून त्यांच्या आत्महत्येस नेमके जबाबदार कोण? याविषयी तर्क-वितर्क काढले जात आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर आनंद मळाळे नांदेड येथे कार्यरत होते. सप्टेंबर महिन्यामध्ये अपघात झाल्याने ते कामावर गैरहजर होते. महिन्याभरापासून ते सोलापूरातील त्यांच्याकुमठा नाका परिसरातील घराकडे आले होते. आज शनिवार पहाटे चारच्या सुमारास माळाळे यांनी स्वतःकडील सव्हिॅस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यामध्ये गोळी झाडून घेऊन आयुष्य संपवले.









