कोल्हापूर :
बसमधून उतरुन पोलीस ठाण्याकडे चालत येत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल दशरथ मुळे यांना खासगी ट्रॅव्हल्सच्या तिघा एंजटानी बेदम मारहाण केली. हा प्रकार शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला असून, याप्रकरणी अकिब अरिफ पठाण, दिलदार मुजावर, जावेद मुजावर (रा. शाहुपूरी, कोल्हापूर) या तिघा ट्रॅव्हल्सच्या एंजटाविरोधी गुन्हा दाखल कऊन, तिघापैकी अकिब पठाण, दिलदार मुजावर या दोघांना अटक केली. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याना पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे एका खटल्यात म्हणणे मांडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयीन काम आटोपून ते बसने कोल्हापूराला आले. मध्यवर्ती बस स्थानकात बसमधून उतरुन, महालक्ष्मी चेंबर समोरुन पोलीस ठाण्याकडे चालत येत होते. यावेळी संशयीत आकिब मुजावर (रा. शाहूपुरी, कोल्हापूर) हा त्यांच्याकडे धावत आला. त्यांचा हात पकडुन पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हल्स उभी आहे, असे म्हणून त्यांना ट्रॅव्हल्समध्ये बसवण्यासाठी जबरदस्तीने घेवून जावू लागला. त्यावेळी त्यांनी आकिब मुजावरला स्पष्ट सांगितले की, मी पोलीस आहे, मला पुण्याला जायायचे नाही, असे म्हणू लागले. तरीही तो त्यांचा हात धरुन उभ्या असलेल्या ट्रॅव्हर्ल्सकडे खेचु घेवून जावू लागला. यावेळी त्यांनी त्याला विरोध केला. त्यावेळी तो बाजुलाच उभे राहुन तिकीट पावती बनवत असलेल्या त्याचा भाऊ दिलदार मुजावरकडे बळजबरीने घेवून जावू लागला, तेंव्हा त्यांनी त्याचा हात झटकला असता अकिब पठाण याने दिलदार मुजावर, जावेद मुजावर या दोघांना बोलावून घेवून, काही कारण नसताना तु पोलीस आहेस ना ? तुला बघुन घेतो, अशी धमकी देत सहाय्यक पोलीस निरीक्षक मुळे यांच्या पाठीमागून येवुन अकिब पठाण याने त्यांच्या शर्टची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. तर संशयीत जावेद मुजावरने त्यांच्या उजव्या डोळयावर हाताने बुक्की मारुन जखमी केले.
या प्रकाराची माहिती मुळे यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना फोनवरुन देवू लागले. यावेळीही तिघा संशयीतांनी त्यांना बेदम मारहाण केल्याने, त्यांच्या कानावर आणि पाठीवर मुका मार लागला आहे. या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात तिघा संशयिताविरोधी सरकारी कामामध्ये अडथळा आणून, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुळे यांना मारहाण कऊन, दुखापत केल्याबाबत गुन्हा नोंद केला. या तिघा संशयितांचा शोध घेवून, तिघापैकी दोघा संशयितांना अटक केली आहे. या गुह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पवार करीत आहेत.








