संस्कार गुपविरुद्ध अमंलबजावणी संचालनालयाची कारवाई
प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने गोव्यात सोमवार, मंगळवारी धडक कारवाई करुन हणजूण येथील मालमत्तेसह दिल्ली व फरिदाबाद येथील मेसर्स संस्कार ग्रुपची सुमारे 24 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. फसवेगीरी तसेच मनी लाँडरिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
हणजूण येथे संस्कार ग्रुपद्वारे विकसीत करण्यात येणाऱया बंजारा हिल्स प्रकल्पात व्हिला देण्याचे वचन ग्राहकांना दिले होते. त्याबाबत सेलडीड प्रक्रिया करण्यात आली होती. ग्राहकांकडून सुमारे 10 कोटी रुपये घेतले होते.
प्रकल्प तारण ठेवून उकळले 20 कोटी
बंजारा हिल्स प्रकल्पाचे 70 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर तोच प्रकल्प जम्मू आणि काश्मिर बँकेच्या पणजी शाखेत तारण ठेऊन सुमारे 20 कोटी रुपये कर्ज काढले होते. कर्जातून मिळालेले 20 कोटी रुपये मनीष शर्मा आणि नवीन बेरी यांनी लावण्या ट्रव्हल्स व अरविंद चड्डा यांच्या बँक खात्यात जमा करून त्याचा वापर स्वतःसाठी केला होता. अशा प्रकारे संस्कार ग्रुपने ग्राहकांची फसवणूक केली होती.
गोवा पोलिसांतील तक्रारीनुसार तपास
गोवा पोलिसांनी नोंदविलेल्या अनेक तक्रारीच्या आधारे मनी लाँडरिंग तपास सुरु केला आहे. मनीष शर्मा आणि असविंद चाड्डा यांच्या विरोधात अमंलबाजावणी संचालनालय तपास करीत आहे. या मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने 24 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मुदत ठेवी जप्त केल्या आहेत.








