कट्टा / वार्ताहर
महाराष्ट्र विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपद भूषवित असलेले विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उद्या 17 जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या मालवण पेंडूर येथील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मांड उत्सवाला भेट देऊन श्री. देव वेताळ व श्री देवी सातेरी मातेचे दर्शन घेणार आहेत. त्यावेळी देवस्थान ट्रस्ट कमिटी व बारा पाच मानकरी, गावकर यांच्या वतीने त्यांचा सत्कार व स्वागत करण्यात येणार आहे. सावंतवाडी येथून सायं. 5 वा. मालवण पेंडूर येथे आगमन व राखीव. श्री देव वेताळ व श्री देवी सातेरी मातेचे दर्शन, मांड उत्सव पाहाणी व नियोजित कार्यक्रम. 6.30 वा. पेंडूर येथून मोटारीने मोपा विमानतळ गोवा येथे प्रयाण असा कार्यक्रम होणार आहे.
Previous Article‘सह्याद्रि’च्या शेअर्स हस्तांतरणाबाबत आयुक्तांना निवेदन
Next Article अंधारी खूनप्रकरणी अरुण कापसेला अटक









