Ajit Pawar News : कर्नाटकच्या निकालानंतर भाजपमध्ये निराशा झालीय. तर मविआत उत्साह निर्माण झाला आहे. लोकसभेच्या वाटपासाठी बैठक होणार आहे. सिल्व्हर ओकवरील बैठकित लोकसभा, विधानसभेच्या जागांबाबत चर्चा झाली. महाराष्ट्रात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. एकत्र निवडणुका लागल्यास धावपळ नको म्हणून मविआची आधीच तयारी सुरु झालीय.जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
सोशल मिडियावरील क्लिपमुळे अकोल्यात राडा झाला. सासंदर्भत बोलताना अजित पवार म्हणाले की, भावना दुखावणाऱ्या क्लिपना आवर घालण्यासाठी सरकारने पावलं उचलावी. राज्यात कायदा- सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आहे.पोलीस यंत्रणेच्या कामात राजकीय हस्तक्षेप नको असंही ते म्हणाले.
जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, यासंदर्भात माझ त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही. आज पाच वाजता मिटिंग आहे. त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








