महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यातून उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आवाहन
प्रतिनिधी/ मुंबई
तिन्ही पक्ष आणि मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे एकत्र बसण्याचा आजचा योग असून आजपासून पुढच्या लढाईची सुऊवात करत आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करावी. आपली तयारी आहे मात्र तयारी असली तरी जेवढे वाटते तेवढी ही लढाई सोपी नसल्याचे सांगत लोकसभेची निवडणूक ही संविधानाच्या रक्षणाची लढाई होती, तर विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र धर्म रक्षणाची लढाई असल्याचे मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यात बोलताना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
ठाकरे पुढे म्हणाले की, महायुतीसोबत लढताना ही लढाई अशी लढावी की एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन अशी लढायला हवी. मात्र हे तू राहशील किंवा मी राहीन हे आपल्या मित्र पक्षात नकोय. नाहीतर काँग्रेस राष्ट्रवादीला बोलतेय राष्ट्रवादी आम्हाला बोलतेय आणि आम्ही आणखी कोणाला बोलतोय असे नको. सरकारला आता जाग येत आहे. आता डुबक्या मारून वाचण्याचा प्रयत्न करत असल्याचे ठाकरे म्हणाले. दरम्यान स्वत:पेक्षा महाराष्ट्राचे हित जपून तिकिट मिळाली नाही तरी विरोधकांना मात्र खाली खेचू असा संकल्प मविआतील सर्व घटकपक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे.
मविआत काड्या घालणारे बरेच असून यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असा प्रश्न विचारून काड्या टाकत आहेत. मात्र त्यांना स्पष्ट म्हणणे आहे की, पृथ्वीराज चव्हाण किंवा शरद पवार यांनी त्यांचा मुख्यमंत्री कोण तो जाहीर करावा, त्याला उद्धव ठाकरे यांचा पाठींबा असेल असे स्पष्ट केले. मी माझ्यासाठी लढतोय अशी भावना नाही. या इतिहासाची पुनरावृत्ती करायची असल्याचे ठाकरे म्हणाले. त्यातही पूर्वीचा महायुती सोबतचा अनुभव सांगत उद्धव ठाकरे यांनी ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे धोरण आखल्यास धोका असल्याचे सांगत कारणासहीत स्पष्ट केले. यात निवडणुकीत समोरच्याचा उमेदवार पडण्याची शर्यत लागत असे. या पाडापाडीच्या राजाकरणात युतीला महत्त्व रा]िहले नसल्याचा अनुभव सांगत या धोरणांनी न जाता आधी ठरवा मग चला पुढे असेही सर्वासमोर स्पष्ट केले.
दूत योजनेत घोटाळा
योजना प्रत्येकाकडे पोहचवणाऱ्याला योजना दूत असे घोषित करून त्याला दहा हजार देण्याचे सरकारने योजना आणली आहे. मात्र यात घोटाळा असून लाडक्या बहीणींना दीड हजार आणि यांच्या चेलाचपाट्यांना दहा हजार देणार. यात खोटी नावे देऊन पैसा ओरबाडला जाण्याची भीती आहे. हा घोटाळा आहे. आम्हाला मोदी सरकार नकोय भारत सरकार हवंय. या धर्तीवर मविआतील सर्वांनी गावागावात जाऊन मविआ सरकारने केलेल्या कामाची माहिती सांगा असे आवाहन मविआतील पदाधिकाऱ्यांना केले.
देशावरील संकट अद्याप कायम आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा इशारा
संविधानावरील संकट दूर झाले नसून ते कायम आहे. संविधानात्मक विचारधारा हे यांच्या स्वत:च्या सुलभतेप्रमाणे असू नये. लोकसभेच्या अधिवेशनात देशाचे पंतप्रधान एक दिवस सुद्धा संसदेत आले नाहीत. त्या सदनाची किंमत तसेच प्रतिष्ठा याकडे ढुंकूनही न बघण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांची आहे. याची प्रचिती वारंवार येत आहे. देशाचे पंतप्रधान किंवा देशाचे सत्ताधारी तसेच देशाचे विरोधी पक्षनेता हे सर्व संस्था आहेत. प्रधानमंत्र्यांनी देशाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. असा वडीलकीचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिला. मविआच्या निर्धार सभेत पवार बोलत होते. नुकत्याच झालेल्या स्वांतत्र्यदिनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसवले होते. त्यावऊन शरद पवार यांनी भाजपावर टीका केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीला संविधान बदलण्यात येणार असल्याच्या मुद्यावर जागऊकता आणली. मात्र संविधान बदलण्याचे संकट अद्याप गेले नसून अजूनही तेच सरकार आहे. या सरकारचे विचार सं]िवधान बदलण्याचे आहेत. त्यामुळे राज्यातही सावध राहिले पाहिजे. लोकसभेला आपण संविधान बदलण्याबाबत भूमिका मांडली होती. संविधानावरील संकट अजूनही गेलेले नाही. कारण आत्ताच जे सरकार आहे. त्यांची जी विचारधारा आहे, त्यामुळे संविधान अडचणीत असल्याचे पवारांकडून यावेळी सांगण्यात आले.