विधानसभेतर्फे रवी नाईक यांच्या निधनाची सूचना जारी
पणजी : कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनाची अधिकृत सूचना गोवा विधानसभेतर्फे जारी करण्यात आली असून आता सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या फोंडा या मतादारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. विद्यमान विधानसभेची मुदत मार्च 2027 पर्यंत आहे. त्यामुळे फोंडा मतदारसंघात पोटनिवडणूक घेणे आता बंधनकारक आहे. केंद्रीय निडणूक आयोग याप्रकरणी काही दिवसानंतर पोटनिवडणूक जाहीर करेल, असा अंदाज आहे. येत्या एप्रिल 2026 पर्यंत फोंडा मतदारसंघासाठी विधानसभा पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. त्यामुळे जो कोण उमेदवार निवडून येईल त्याला साधारपणे एका वर्षाचा कालावधी आमदार या नात्याने मिळणार आहे.









