फुकेरी खालचीवाडी ग्रामस्थांचे समाधान
ओटवणे प्रतिनिधी
गेल्या एक वर्षापासुन डांबरीकरण रखडलेल्या फुकेरी खालचीवाडी येथील रस्त्याचे डांबरीकरण अखेर पूर्ण करण्यात आले असुन फुकेरी ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या अनेक वर्षाच्या मागणीनंतर या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी शासनाच्या २५/१५ योजनेतून निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या कामाचा शुभारंभही करण्यात आला. परंतु त्यानंतर कोणतेही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे काम गेले वर्षभर जैसे थे होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचे फुकेरी ग्रामपंचायत सदस्या सौ. जोत्स्ना शंभा आईर आणि बाबू महादेव आईर तसेच भाऊ आईर यानी अनेक वेळा लक्ष वेधले. परंतु त्यांनीही केवळ आश्वासना पलीकडे कोणतीही कार्यवाही केली नाही. उलट याकडे दुर्लक्ष करीत ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम केले. त्यामुळे फुकेरी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती.या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे हा रस्ता धोकादायक बनला होता. खराब रस्त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गासह ठेकेदाराने याची तात्काळ दखल घेऊन रस्त्याच्या मजबुती करण्यासह डांबरीकरपणाबाबत कार्यवाही करावी. अन्यथा पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांसह सावंतवाडीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर फुकेरी ग्रामस्थांसह उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्या सौ. जोत्स्ना शंभा आईर आणि बाबू महादेव आईर आणि भाऊ आईर यानी दिला होता. त्यानंतर याची तात्काळ दखल घेऊन या रखडलेल्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले.









