पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी
संगमेश्वर प्रतिनिधी
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबे फाटा ते पोचरी फाटा रस्त्याचे डांबरिकरण करताना डांबर कमी तर रस्ता उखडू लागल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. काम निकृष्ट होत असताना कुणी लक्ष देत नसल्याने ग्रामस्थ नाराज झाले असून या सर्व कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ठेकेदार कंपनीकडून निकृष्ट काम होत असताना जे ई तसेच बांधकाम विभागाच्या अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याने त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परचुरी गावातील ग्रामस्थांना पूल नसल्याने फरफट होत होती.याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष सहकार्याने परचुरी पूल बांधल्यानंतर येथे ग्रामस्थांची परवड थांबली होती.. पोचरी फाटा मार्गे गणपतीपुळे तीर्थक्षेत्राकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग जोडलेला आहे मात्र गेले अनेक वर्ष हा रस्ता दुर्लक्षित असल्याने त्याला मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा व् यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली होती त्यांच्या मागणीनुसार पोचरी फाटा ते कोळंबेपर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम गेले काही दिवस सुरू आहे. सुमारे 3 कोटीचे काम करीत असताना डांबरचा वापर कमी होत असून रस्ता आताच खराब होऊ लागला आहे. मात्र हे काम करताना ठेकेदार कंपनीकडून निकृष्ट दर्जेचे काम केले जात असताना जे ई तसेच संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष देणे गरजेचे होते मात्र त्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे याकामाच्या संदर्भात त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी
पोचरी फाटा ते कोळंबे रस्त्याचे डांबरीकरण काम सुरू आहे. मात्र हे काम निकृष्ट होत असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ आणि रिक्षा चालक हरीचंद्र बंडबे यांनी केली आहे. या मार्गावर मी सतत प्रवाशांना घेऊन जात असतो मात्र हा रस्ता आताच उखडू लागला असल्याने चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
शर्वरी वेल्ये – सरपंच
परचुरी फाटा ते कोळंबे या कामाबाबत मला जास्त काही माहिती नसल्याने मी बोलू शकत नाही मात्र या कामासाठी 3 कोटी रुपये निधी आल्याचे सरपंच शर्वरी वेल्ये यांनी सांगितले