आता विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
वेंगुर्ला कॅम्प मैदानात दिनांक ९ ऑक्टोबर रोजी शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग दर्शवला होता . या स्पर्धेमध्ये आसोली या प्रशालेतील १४ वर्षाखालील मुलगे व मुली आणि १७ वर्षवयोगटातील मुलगे व मुली यांनी सहभाग घेतला होता . यामध्ये महादेव राघोबा राऊळ याने १०० मी व ४०० मी धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला . व १७ वर्षांखालील मुलगे यामध्ये कौस्तुभ संतोष मांजरेकर याची ४०० मी धावणे यात द्वितीय क्रमांक आला . तसेच संकेत न्हानू गावडे याने गोळाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला . या तिन्ही विद्यार्थ्यांची आता जिल्हास्तरावर निवड झाली असून आसोली शाळेचे संस्था अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक सौ. भावना धुरी व मार्गदर्शक शिक्षक सागर सोन्सुरकर , श्री . जाधव यांचे अभिनंदन केले आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









