प्रतिनिधी/ मडगाव
असोल्डा येथील श्री सांतेरी ग्रामदेवीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या शुक्रवार दि. 27 व शनिवार दि. 28 जानेवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानिशी साजरा केला जाणार आहे. शुक्रवारी सकाळी 9 वा. श्री सांतेरी ग्रामदेवीस महाअभिषेक, पूजा, नैवेद्य, आरती, रात्री 8 वा. पुराण, आरती, तीर्थ-प्रसाद व कोकणी नाटक ‘आंगार कुत्रो मोगान भित्रो’ सादर करण्यात येईल.
शनिवार दि. 28 रोजी सकाळी 9 वा. श्री सांतेरी ग्रामदेवीस महाअभिषेक, पूजा, नैवेद्य, आरती, रात्री 8 वा. आरती, तीर्थ-प्रसाद व कोकणी नाटक ‘डबल धमाल’ सादर करण्यात येईल. भाविकांनी या जत्रोत्सवला उपस्थित राहून श्रींच्या तीर्थ-प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.









