सावंतवाडी । प्रतिनिधी
असनिये गावातील जीर्ण झालेल्या वीज वाहिनीसह विद्युत खांब गणेशोत्सवापूर्वी बदलण्यासह ट्रान्सफॉर्मरसह इतर मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन महावितरणचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांनी दिल्यानंतर मंगळवारी दुपारी असनियेवासीयांनी सावंतवाडी विज कार्यालयासमोर छेडलेले आंदोलन स्थगित केले.तत्पूर्वी असनिये ग्रामस्थांनी सावंतवाडीचे विज उप अभियंता शैलेंद्र राक्षे आणि बांदा येथील सहायक अभियंता श्री ठाकूर यांना गावातील विविध प्रलंबित विज समस्यांबाबत वारंवार दुर्लक्ष केल्याबद्दल जाब विचारला. तसेच अनेक प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांची बोलती बंद केली. यावेळी तणाव निर्माण झाल्यामुळे सावंतवाडी पोलीस अधिकारी व कर्मचारीही दाखल झाले. यावेळी संतप्त असनिये ग्रामस्थांनी महावितरणच्या उदासीन भूमिकेसह बेजबाबदार कारभाराचा पंचनामाच केला.दरम्यान जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, प्रमोद कामत, रवींद्र मडगावकर, गुरुनाथ पेडणेकर, गुरुनाथ सावंत आदींनी वीज कार्यालय गाठून संबंधित अधिकारी वर्गांशी चर्चा केली. तसेच असनिये ग्रामस्थांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेण्याची सूचना करून यासाठी शासन पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.यावेळी सरपंच रेश्मा सावंत, संदीप सावंत, जितेंद्र सावंत, राकेश सावंत, ओंकार सावंत, विठ्ठल ठिकार, दत्तप्रसाद पोकळे, समीर कोलते, शरद सावंत, दशरथ सावंत, सुधाकर घोघळे, भिकाजी नाईक, विजय सावंत, विद्या सावंत, विकास सावंत, अभिमन्यू सावंत, अमित सावंत, अनिल सावंत, रामचंद्र घोघळे, सोहम सावंत, श्रीधर सावंत, सुमन असनकर, प्रसाद दामले, विलास ठिकार, लक्ष्मण सावंत, रत्नाकर सावंत, शौनक दामले, भिकाजी सावंत, ओंकार भुस्कुटे, विनायक कोळापटे, संजय सावंत, गणपत सावंत, प्रवीण ठिकार, देवेंद्र सावंत, शैलेश खाडिलकर, बाळकृष्ण मेस्त्री, धोंडी सावंत, सतीश सावंत, उमेश पोकळे, सुभाष सावंत, विलास बर्वे, आनंद सावंत, दीपक पेडणेकर, मिलिंद देसाई, ओंकार सावंत, न्हानु सावंत, आदी असनिये ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









