क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव स्नूकर संघटना आयोजित अस्मिता एंटरप्रायझेस पुरस्कृत अस्मिता चषक निमंत्रितांच्या आंतरराज्य स्नूकर स्पर्धेत उद्घाटन दिवशी फिरोज, महुद्दीन, तरुण, प्रकाश, अतुल, अजिम, सोहेल यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजयी सलामी दिली.
दुसरा रेल्वेगेट, टिळकवाडी येथील बेळगाव जिल्हा स्नूकर संघटनेच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्नूकर स्पर्धेचे उद्घाटनावेळी अस्मिता एंटरप्रायझेसचे संचालक राजेश लोहार, वसंत सोनोलकर, अतित बेळेकर, असिम मुल्ला, अजिमखान पांगेरी, अमजत, शहानवाज तरकार आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेश लोहार यांनी स्नूकर चेंडू सरकवून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी पंच हबिब मुल्ला, अमजत, शहानवाज तरकार, अजिमखान पांगेरी उपस्थित होते. पहिल्या सामन्यात फिरोज वि.वि. राहुल 2-0, दुसरा सामना मैनुद्दीन वि.वि. मुत्तुराज 2-0, तिसऱया सामन्यात तरुण वि.वि. मन्सुर 2-0, चौथ्या सामन्यात प्रकाश विजय वि.वि. अनुज 2-0, पाचव्या सामन्यात प्रकाश विजय वि.वि. अतुल 2-0, सहाव्या सामन्यात अजिम पी. वि.वि. विजय 2-0, सातव्या सामन्यात सोहेल मुलतानी वि.वि. श्रेयस गोवा 2-0..
तीन दिवस चालणाऱया या स्पर्धेत रविवारी सायंकाळी अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. त्यानंतर बक्षीस वितरण होईल.









