बेळगाव : पाँडिचेरी येथे इंडियन बॉडिबिल्डर्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शरीरसौ÷व पंच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बेळगावच्या शरीरसौ÷व पंचांचा अस्मिता एन्टरप्रायझेस बेळगाव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
भाग्यनगर येथील अस्मिता एन्टरप्रायझेसच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सत्कारप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एएसआय चिन्नास्वामी, राजेश लोहार, अतित बेळेकर व वसंत सोनोलकर आदी उपस्थित होते. राष्ट्रीय पंच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सुनील राऊत व राजू लंगरकांडे यांचा या मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.









