आचरा प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार आचरा येथील कोरोना योद्धा म्हणून सन्मानित झालेल्या तसेच तालुका स्तरीय, जिल्हा स्तरीय आशा स्वयंसेविका पुरस्कार प्राप्त, विकसित भारत संकल्प यात्रा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरविण्यात आलेल्या अस्मिता आचरेकर आणि रमिता जोशी यांना सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर,पंकज आचरेकर, चंदू कदम, अनुष्का गावकर, श्रृती सावंत, हर्षला पुजारे, सायली सारंग,पूर्वा तारी,माजी उपसरपंच पाडूरंग वायंगणकर,अजित घाडी,आशा स्वयंसेवीका ,ग्रामपंचायत कर्मचारी यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.









