जाणून घ्या मदतीच्या भावामागील विज्ञान
लोक परस्परांमध्ये मदत मागण्यास किंवा तुम्हाला मदत करण्यास टाळाटाळ करत आहेत का हे जाणून घेण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (युसीएलए) आणि ऑस्ट्रेलियाच्या सिडनी युनिव्हर्सिटीच्या समाजशास्त्रज्ञांनी मिळून एक संशोधन केले आहे. याकरता कुठलाही एक देश नव्हे तर विविध ठिकाणी आणि परस्परांपेक्षा अत्यंत वेगळय़ा असलेल्या संस्कृतीच्या लोकांची निवड करण्यात आली. एकूण 5 खंडांमध्ये 8 भाषा बोलणारे परिवार आणि अनोळखी लोकांमधील संभाषण अभ्यासण्यात आले आहे. याचे निष्कर्ष अत्यंत दिलासा देणारे आहेत. मदत मागितल्यास बहुतांशवेळा मदत मिळत असते असे तज्ञांना आढळून आले आहे.
संशोधकांनी 350 हून अधिक लोकांच्या दैनंदिन संभाषणाचे 40 तासांचे रेकॉर्डिंग ऐकले आहे. यादरम्यान दर दोन मिनिटांनी लोक कुठल्या न कुठल्या समस्येत असल्याचे आढळून आले. तसेच अनेकदा त्यांच्याकडून उघडपणे मदत मागितली जाते, तर अनेकदा ते स्थितीशी संघर्ष करत असल्याचे पाहून अन्य लोक स्वतःहून मदत करत असल्याचे दिसून आले आहे.

नेचर सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित हे अध्ययन दैनंदिन जीवानत लोक छोटय़ा-मोठय़ा कामांदरम्यान मदत घेत असतात. यात स्वयंपाक तयार करण्यासंबंधी, सामग्री शोधण्यात मदत मागितली जात असते, याला लो-कॉस्ट हेल्प म्हटले गेले आहे, ज्यात वेळ, पैसा किंवा अन्य कुठल्याही प्रकारचा खर्च कमीतकमी होतो.
संशोधकांनी गरजू लोकांना सलग 7 वेळा मदत मिळते, ज्यानंतरच नकार दिला जातो. हा नकार देखील हाय-कॉस्ट हेल्पकरता असतो. येथे देखील नकार देण्याचे कारण समोरचा व्यक्ती मदत करू इच्छित नाही हे नसते, तर अनेकदा व्यस्त असणे किंवा अन्य कारण असते. तसेच ज्याप्रकारची मदत हवी असते, ती समोरच्या व्यक्तीच्या आवाक्याची नसण्याची शक्यता असते. मदतीसाठी नकार देण्याच्या 74 टक्के प्रकरणांमध्ये संबंधितांकडून कारणेही सांगितली जातात.
‘शेयर्ड क्रॉस-कल्चरल प्रिंसिपल्स अंडरलाय ह्युमन प्रोसोशल बिहेवियर’ या नावाने प्रसिद्ध संशोधनात इटली, ब्रिटन, पोलंड, रशिया, घाना, लाओस, ऑस्ट्रेलिया आणि इक्वेडोरपर्यंच्या लोकांमधील पस्पर संभाषणात मदतीचा पॅटर्न पाहिला गेला आहे. परस्परांना मदत करण्याची सवय सर्व संस्कृतींमध्ये एकसारखीच असल्याचे उद्गार सिडनी युनिव्हर्सिटीचे संशोधक निक एनफील्ड यांनी काढले आहेत.
काही संस्कृतींमध्ये मदतीसाठी नकार अधिक दिसून येतो, ऑस्ट्रेलियाची एक विशेष भाषा बोलणाऱया लोकांमध्ये याचे प्रमाण काहीसे अधिक दिसून आले. 100 पैकी 26 टक्के प्रकरणांमध्ये मदतीची विनंती या लोकांमध्ये नाकारली जाते. तर बहुतांश ठिकाणी न मागता देखील मदत मिळते. तर काही संस्कृतींमध्ये मदतीसाठी बोलावे लागते. संशोधनानुसार इंग्लिश आणि इटालियन संस्कृतीत न मागता मदत मिळण्याचे प्रमाण कमीच दिसून येते.









