ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अजित पवारांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. उत्तराखंडमध्येही असे एक नेते आहेत. जे कितीही वेळा पराभव झाला तरी ते हार मानत नाहीत. तसेच अजित पवार आहेत. त्यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते कायम तयार असतात, अशी मिश्किल टिपण्णी भगतसिंह कोश्यारी यांनी केली.
भगतसिंह कोश्यारी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले, अजित पवारांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. कितीही वेळा पराभव झाला, तरी ते हार मानत नाहीत. तसेच त्यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते कायम तयार असतात. ते हुशार आहेत. त्यांचा चांगला जनाधार आहे. संघटनेत त्यांची ताकद आहे. त्यामुळे अनेक आमदार आणि खासदार त्यांच्याबरोबर असतात. प्रत्येकांचं एक व्यक्तिमत्व असतं, असं कोश्यारी यांनी म्हटलं आहे.








