बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी बसवान कुडची येथे भेट देऊन परिसराची पाहणी केली आणि जनता दरबार घेतला. या भेटी दरम्यान त्यांनी रस्ते,वीज, पाणी,गटर, शैक्षणिक सुविधा यांच्या बरोबरच नागरिकांना भेडसावणाऱ्या इतर असुविधा जाणून घेतल्या. यावेळी रहिवाशांशी संवाद साधून दैनंदिन जीवनात लोकांना असुविधांना सामोरे जावे लागणार नाही. नागरिकांना भेडसावणाऱ्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील. असे आश्वासन त्यांनी रहिवाशांना दिले. रहिवाशांना मदत करू शकतील आशा आवश्यक सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करून दिल्या जातील. त्याच बरोबर परिसरात असलेल्या गैरसोयी व इतर कारणे जाणून घेण्यासाठी त्यांनी रहिवाशांसह परिसराचे सर्वेक्षण केले. यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक नगरसेवक इतर प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते. आमदारांनी वैयक्तिकरित्या या बसवाण कुडची परिसरातील समस्येकडे लक्ष दिल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









