वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
7 ते 15 एप्रिल दरम्यान नवी दिल्लीत होणाऱया आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेचे ठिकाण बदलण्यात आले असून आता ही स्पर्धा अस्ताना येथे खेळविली जाईल, अशी माहिती विश्व कुस्ती फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली आहे.
आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धा यापूर्वी नवी दिल्लीत 28 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. आंतरखंडीय कुस्ती स्पर्धेच्या तारखेत आणि ठिकाणातही आता बदल करण्यात आला आहे. भारतीय कुस्ती फेडरेशनमधील काही गैरकारभाराची चौकशी अद्याप करण्यात आली नसून भारतीय क्रीडा मंत्रालयाने ही चौकशी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला होता. अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंग यांच्याविरुद्ध चौकशीचा आदेश यापूर्वी देण्यात आला होता. पण ती अद्याप झाली नसल्याने विश्व संयुक्त कुस्ती फेडरेशनने या स्पर्धेचे यजमानपद बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 साली अस्तानामध्ये विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी करण्यात आली होती. तसेच 2021 च्या आशियाई कुस्ती स्पर्धेचे यजमानपद कझाकस्तानने भूषविले होते. गेल्या वषी तिसऱया मानांकन कुस्ती मालिका स्पर्धेचे यजमानपद अल्मेटी शहराने भूषविले होते. किर्गीस्तानमधील बिसकेक या शहराला वरि÷ांच्या तसेच 17 वर्षांखालील आणि 23 वर्षांखालील वयोगटाच्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेचे यजमानपद दिले आहे. ही स्पर्धा सलग दुसऱया वर्षी किर्गीस्तानमध्ये होत आहे. सदर स्पर्धा 10 ते 18 जून दरम्यान खेळविली जाणार आहे. त्याचप्रमाणे 15 वर्षांखालील आणि 20 वर्षांखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धा जॉर्डनमधील अम्मान येथे 12 ते 20 जुलै दरम्यान होणार आहे.









