युरोपीय देशांच्या तुलनेत कमी गुणवत्तेची झोप
विविध देशांमध्ये लोकांची झोप कशी भिन्न असते याची माहिती पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. परंतु मागील काही अध्ययनांमध्ये पूर्व आशियाचे लोक अमेरिका किंवा युरोपच्या लोकांच्या तुलनेत कमी झोपतात असे आढळून आले आहे. परंतु त्यांच्या झोपेची गुणवत्ता चांगली आहे का नाही याबद्दल कुठलीच माहिती नाही.
लोकांमधील झोपेची गुणवत्ता जाणण्यासाठी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि ओरा हेल्थ, एक फिनिश स्लीप-टेक स्टार्टअपच्या संशोधकांनी अध्ययन केले आहे. अध्ययनादरम्यान जगातील 35 देशांच्या लोकांच्या झोपेच्या सवयींचे विश्लेषण करण्यात आले.

झोपेच्या पॅटर्नचे अध्ययन
अध्ययनासाठी 2021 आणि 2022 दरम्यान स्लीपिंग अॅपद्वारे 2.2 लाखाहून अधिक लोकांच्या स्लीप पॅटर्नची माहिती जमविण्यात आली. या माहितीतून सर्व देशामंध्ये झोपेचा पॅटर्न अत्यंत वेगवेगळा असतो हे आढळून आले. सर्वात कमी गुणवत्तेची झोप घेणारे लोक प्रामुख्याने आशियाई देशांमध्ये आहेत. येथील लोक सामान्यपणे रात्री साडेसहा तासांपेक्षाही कमी वेळेसाठी झोपतात. जगाच्या उर्वरित हिस्स्यांच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे 30 मिनिटांनी कमी आहे. आशियाई लोकांना बेडवर पडल्यावर झोपी जाण्यास सरासरी 35 मिनिटे अधिक लागतात. तर कूस बदलण्यात देखील ते अधिक वेळ घालवत असतात.
याचबरोबर आशियात लोक केवळ उशिराने झोपतात असे नाही तर जगातील अन्य हिस्स्यांमधील लोकांच्या तुलनेत कमी झोपतात. त्यांची झोप देखील सातत्याने कमी होत असते. एकीकडे उर्वरित देशांचे लोक आठवडाभराची झोप पूर्ण करण्यासाठी वीकेंडवर 5-25 मिनिटे अधिक झोपतात. तर आशियाई लोक वीकेंडवर देखील कमी झोप घेतात.
कामाचा मोठा प्रभाव
जगभरात लोकांचे काम देखील झोपेच्या पॅटर्नला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. याचबरोबर झोपेसाठी मुलांची देखभाल आणि सांस्कृतिक प्रथा देखील अधिक महत्त्वाच्या असल्याचे संशोधकांचे मानणे आहे.









