वृत्तसंस्था/ कुवेत, बिजिंग
यापूर्वी लांबणीवर टाकण्यात आलेली आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 साली 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान हांगझोयू येथे होणार आहे.
आशियाई ऑलिम्पिक मंडळाने या स्पर्धेची पुढील तारीख मंगळवारी घोषित केली. 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा यापूर्वी म्हणजे 2022 च्या 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान घेण्याचे ठरले होते. दरम्यान चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रसार सुरू झाल्याने ही स्पर्धा तहकूब करण्याचा निर्णय 6 मे रोजी जाहीर केला होता. आता या स्पर्धेची तारीख निश्चित करण्यात आलेली असून 2023 मध्ये ही स्पर्धा 23 सप्टेंबर-8 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहे.









