वृत्तसंस्था/ अल रेयान (कतार)
बलाढ्या ऑस्ट्रेलियाविऊद्ध हार पत्करावी लागली असली, तरी त्या सामन्यात जोरदार झुंज दिलेल्या भारताला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेतील त्यांच्या दुसऱ्या गट सामन्यात आज गुऊवारी उझबेकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. सुऊवातीच्या सामन्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी यावेळी करून दाखविण्याचा भारताचा मानस असेल.
14 जानेवारी रोजी झालेल्या सलामीच्या लढतीत विजेतेपदाच्या दावेदार मानल्या जाणऱ्या ऑस्ट्रेलियाकडून भारताला 0-2 असा पराभव पत्करावा लागला खरा, पण त्यांनी 50 मिनिटांपर्यंत कोणताही गोल होऊ दिला नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सर्वोत्तम आक्रमण केले, पण सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील खेळाडूंनी मोठ्या फरकाने पराभव टाळला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशेषत: पहिल्या सत्रात भातीय संघाचा बचाव भक्कम दिसला. उझबेकविऊद्ध ते कायम ठेवण्याची त्यांची इच्छा असेल. उझबेकिस्तानच्या संघाला सुऊवातीच्या सामन्यात सीरियाविऊद्ध 0-0 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागल्याने ते थोडे निराश झाले आहेत.
भारत जागतिक यादीत 102 क्रमांकावर असून त्या तुलनेत उझबेकिस्तान जगात 68 व्या क्रमांकावर असला, तरी हा मध्य आशियाई संघ ऑस्ट्रेलियन संघासारखा धोकादायक ठरणार नाही, असे सुनील छेत्रीने म्हटलेले असून त्याचे हे विचार भारताची योजना काय राहील त्याचे संकेत देतात. ‘उझबेकिस्तान हा काही ऑस्ट्रेलिया नाही, पण तरीही ती चांगली बाजू आहे. त्यामुळे या सामन्यातही मोठे आव्हान असेल’, असे ऑस्ट्रेलियाविऊद्ध गोल करण्याची संधी गमावलेल्या छेत्रीने म्हटले आहे.
छेत्रीने यापूर्वी कबूल केले होते की, उझबेकिस्तान तसेच ऑस्ट्रेलिया हे विश्वचषक स्तरावरील संघ आहेत. परंतु त्याला आणि त्याच्या संघाला उझबेक संघाची फारशी धास्ती वाटणार नाही. भारत उझबेकिस्तानविऊद्ध बचावावर जास्त भर देणार नाही. त्याऐवजी स्वत:चा खेळ खेळून प्रतिहल्ले करण्याकडे त्यांचा कल राहू शकतो. छेत्री, मनवीर सिंग आणि इतर आघाडीपटू या सामन्यात निश्चितच संधीच्या शोधात असतील. ऑस्ट्रेलियाविऊद्ध त्यांच्यासाठी या संधी जवळजवळ अस्तित्वातच नव्हत्या. संदेश झिंगन हा नेहमीप्रमाणे बचावातील प्रमुख खेळाडू असेल. झिंगननेच ऑस्ट्रेलियाविऊद्ध भारतीय बचावाचे नेतृत्व केले.
उझबेकिस्तान हा एक असा संघ आहे ज्याने गेल्या एका वर्षात इराण आणि मेक्सिकोला बरोबरीत रोखण्याबरोबर चीन, ओमान आणि बोलिव्हियाला पराभूत करून दाखविलेले आहे. ते सध्या फिफा क्रमवारीत आशियाई देशांमध्ये नवव्या स्थानावर आहेत. उझबेकिस्तानने सीरियाविऊद्ध वर्चस्व राखले खरे, परंतु सुमारे डझनभर फटके हाणून लक्ष्य गाठण्यात त्यांना अपयश आले. सीरियालाही या सामन्यात पुरेशा संधी मिळाल्या. त्यामुळे संधीच्या शोधात असलेल्या भारतीयांचा निश्चितच हुरुप वाढेल.









