वृत्तसंस्था/लाहोर
भारतीय संघाने आशिया कप जिंकल्यानंतर नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता नक्वी ती ट्रॉफी त्यांच्यासोबत घेऊन गेले आणि तेव्हापासून ती एसीसी दुबई कार्यालयात ठेवण्यात आले आहे. 28 सप्टेंबर रोजी दुबई येथे झालेल्या आशिया कप फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभूत केले. आशिया कप ट्रॉफी दुबई येथील आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) मुख्यालयात बंद ठेवण्यात आली आहे. संस्थेचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी त्यांच्या परवानगीशिवाय ती भारताला सुपूर्द करू नये असे निर्देश दिले आहेत. आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय संघाने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला व नक्वी यांनी ती ट्रॉफी त्यांच्यासोबत घेऊन गेले आणि तेव्हापासून ती ट्रॉफी एसीसी कार्यालयात ठेवण्यात आले. नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री देखील आहेत. नक्वी यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, ही ट्रॉफी सध्या दुबईतील एसीसी कार्यालयात आहे आणि नक्वी यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, त्यांच्या परवानगीशिवाय आणि वैयक्तिक उपस्थितीशिवाय ती कोणालाही देऊ नये. त्यांनी असेही सांगितले की, नक्वी यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, केवळ तेच वैयक्तिकरित्या ट्रॉफी भारतीय संघाला किंवा बीसीसीआयला (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) सोपवतील.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या सावलीतच आशिया कप खेळविण्यात आला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही हे नक्वी यांनी इंटरनेटवर राजकीय विधानेही केली. बीसीसीआयने नक्वी यांच्या ट्रॉफी हिरावून घेण्याच्या कृतीवर तीव्र आक्षेप घेतला आणि पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर आयसीसीच्या सुत्रांनी मिळालेल्या महितीनुसार नक्वी यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना आयसीसी संचालक पदावरून काढून टाकण्यात येऊ पण शकते.









