वृत्तसंस्था/ नागपूर
2023 साली होणाऱया आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे ठिकाण पाक ऐवजी लंकेत असा बदल करावा, अशी वैयक्तिक सूचना भारतीय संघातील अव्वल फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने केली आहे.
2023 साली होणाऱया आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क यापूर्वीच पाकिस्तानला देण्यात आले आहेत. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या ठिकाणात अश्विनने बदल सूचविला आहे. सदर स्पर्धा पाकऐवजी लंकेत घेतली जावी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सदर स्पर्धा पाकिस्तानमध्ये घेण्याचे ठरविले तर भारतीय संघ या स्पर्धेतून माघार घेईल. भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये सुरक्षा समस्येमुळे दाखल होऊ शकणार नाही तथापि या स्पर्धेचे ठिकाण त्रयस्थ रहावे, असे आशियाई क्रिकेट मंडळाचे प्रमुख जय शहा यांनी गेल्या वर्षी सूचित केले होते. दरम्यान स्पर्धेच्या ठिकाणात बदल करण्यासाठी आशियाई क्रिकेट मंडळाच्या कार्यकरिणी समितीच्या बैठकीची दुसरी फेरी मार्चअखेरीस होणार आहे. या बैठकीत या स्पर्धेच्या ठिकाण बदलामध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल. दरम्यान सदर स्पर्धा श्रीलंकेत हलविली जाईल असे विश्वसनीय गोटातून सूचित करण्यात आले आहे. चालू वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱया आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वीची आशिया चषक स्पर्धा ही महत्त्वाची राहणार आहे. अलीकडच्या कालावधीत अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा दुबईमध्ये यशस्वीपणे झाल्या आहेत. दरम्यान सदर स्पर्धा लंकेत घेतली तर ती अधिक सुखकारक आणि यशस्वी होईल असे रविचंद्रन अश्विनने आपल्या व्हिडिओद्वारे ट्विट केले आहे.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी बीसीसीआयने पाकच्या दौऱयाला नकार दर्शविला तर भारतात चालू वर्षाच्या अखेरीस म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान होणाऱया आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून पाकचा संघ माघार घेऊ शकत नाही असे स्पष्टीकरण अश्विनने दिले आहे. आशिया चषक स्पर्धा पाकमध्ये भरविली गेली तर बीसीसीआयने यापूर्वीच भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही असे घोषित केले जाईल. या स्पर्धेत भारत सहभागी झाला नाही शौकिनांकडून या स्पर्धेला चांगला प्रतिसाद कदाचित मिळू शकणार नाही. या स्पर्धेचे भारत प्रमुख आकर्षणही राहिल. भारतीय संघाला या स्पर्धेत खेळावयाचे असल्यास या स्पर्धेचे ठिकाण बदलणे आवश्यक राहिल असेही अश्विनने म्हटले आहे. पाकचे माजी क्रिकेटपटू जावेद मियादाद आणि रमिज राजा यांनी वाद्ग्रस्त विधाने करून भारतीय क्रिकेट शौकिनांना दुखावले आहे. भारतात होणाऱया आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी पाककडून देण्यात आली असली तरी त्यांना ही स्पर्धा चुकवता येणार नाही असेही असेही अश्विनने म्हटले आहे. या स्पर्धेच्या ठिकाणाबाबतच्या वाद्ग्रस्त जटील समस्येवर समाधानकारक तोडगा निश्चित काढला जाईल अशी आशा अश्विनने व्यक्त केली.









