29 ऑगस्टपासून प्रारंभ, शुभंकर, चषकाचे अनावरण
वृत्तसंस्था / पाटणा
नालंदा जिल्ह्यातील अलिकडेच नव्याने बांधण्यात आलेल्या सुसज्ज अशा राजगीर हॉकी स्टेडियममध्ये 29 ऑगस्टपासून 12 व्या पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी बिहारला मिळाली आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 7 सप्टेंबरला खेळविला जाईल. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या स्पर्धेच्या शुभंकर आणि चषकाचे अनावरण केले.
बिहारमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत यजमान भारत, चीन, जपान, चीन तैपेई, मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांगलादेश या संघांचा समावेश राहील. सदर स्पर्धा 7 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. 2025 च्या आशिया चषक पुरुषांच्या हॉकी स्पर्धेचे हिरो हे पुरस्कर्ते आहेत. 2024 साली महिलांची आशियाई चॅम्पियन हॉकी करंडक स्पर्धा बिहारमध्ये यशस्वीपणे भरविली गेल्याने आता पुरुषांच्या 12 व्या आशिया चषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद राजगीरला मिळाले आहे. ही स्पर्धा सात सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या स्पर्धेचे बोधचिन्ह चांद आणि करंडकाचे अनावरण केले. 2024 च्या महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेतील जेतेपद भारताने पटकाविले होते. आता 2025 च्या आशिया चषक पुरुष हॉकी स्पर्धेसाठी आशिया खंडातून अव्वल सहा संघांचा समावेश राहील. त्यामध्ये यजमान भारताचा समावेश आहे.









