वृत्तसंस्था / सिडनी
अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन आगामी बिग बॅश लीग हंगामासाठी सिडनी थंडरमध्ये सामील होणार आहे. जो या स्पर्धेत सहभागी होणारा पहिला हाय प्रोफाईल भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्त झालेल्या 39 वषींय खेळाडूने थंडरशी वचनबद्ध असल्याचे समजते. असे फॉक्स स्पोर्ट्सने वृत्त दिले आहे. या आठवड्याच्या अखेरीस फ्रँचायझी अधिकृत घोषणा करण्याची अपेक्षा आहे. तो 14 डिसेंबर ते 18 जानेवारी दरम्यान चालणाऱ्या हंगामाच्या उत्तरार्धात थंडरमध्ये सामील होण्याची अपेक्षा आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ टॉड ग्रीनबर्ग यांनी या महिन्याच्या सुरूवातीला अश्विनशी त्यांच्या बीबीएल सहभागाची शक्यता तपासण्यासाठी वैयक्तिकरित्या संपर्क साधला होता. अश्विनने गेल्या महिन्यात आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याला फ्रँचायझी क्रिकेटमध्ये फ्री एजंट बनवण्यात आले आणि परदेशी टी-20 लीगसाठी दवाजे उघडले. बीसीसीआयने सक्रिय भारतीय खेळाडूंना राष्ट्रीय संघ किंवा आयपीएल मध्ये सहभागी असताना परदेशी लीगमध्ये भाग घेण्यास बंदी घातली आहे.
अश्विनने या वर्षीच्या बीबीएल परदेशी ड्राफ्टसाठी नोंदणी न केल्3यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला त्याला 2022 मध्ये मेलबर्न रेनेगेड्समध्ये सामील होण्यास उशीरा मिळालेल्या मंजुरीप्रमाणेच त्याला सूट द्यावी लागेल. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान अश्विनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घेतली होती. त्याच्या उत्तम कामगिरीमुळे तो 537 बळींसह देशातील दुसऱ्या क्रमांकाचा कसोटी सर्वाध्घ्कि बळी घेणारा गोलंदाज बनला. फक्त अनिल कुंबळेच्या 619 बळीनंतर आयरपीएलमध्ये अश्विनने 221 सामन्यांमध्ये 30.22 च्या सरासरीने 187 बळी घेतले आणि त्याचे सर्वोत्तम आकडे 4/34 होते. त्याने 833 धावांचे योगदान देखील दिले.









