वृत्तसंस्था/चेन्नई
ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या कसोटी मालिकेच्या मध्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे गुऊवारी सकाळी मायदेशी आगमन झाले. अशिवनला स्थानिक अधिकाऱ्यांनी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर काढले होते. त्याची प्रतीक्षा करत असलेल्या माध्यमांशी न बोलता कुटुंबासह तो रवाना झाला. मात्र त्यापूर्वी उपस्थित असलेल्या चाहत्यांनी त्याची छायाचित्रे काढली. फोटो काढले होते. तीन सामन्यांनंतर 1-1 अशा बरोबरीत असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या मध्यास बुधवारी अश्विनने निवृत्ती जाहीर केली. तो आयपीएलसह क्लब क्रिकेट खेळत राहील. चेन्नईला रवाना होण्याच्या दृष्टीने बुधवारी संध्याकाळच्या विमानात चढण्यापूर्वी अश्विनने आपल्या सहकाऱ्यांना देखील संबोधित केले होते आणि त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांच्यासाठी हजर होण्याचे आश्वासन दिले होते. ‘माझ्यामधील क्रिकेटर, भारतीय क्रिकेटपटू, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू कदाचित संपुष्टात आला असेल, पण माझ्यामधील क्रिकेट कधीच संपणार नाही, असे त्याने ड्रेसिंग रूममध्ये केलेल्या आणि बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या निरोपाच्या भाषणात सांगितले होते. मर्यादित षटकांच्या स्पर्धांचा विचार करता 2011 मधील विश्वचषक आणि 2013 मधील चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघांचा भाग तो राहिला होता आणि हे अश्विनच्या 14 वर्षांच्या कारकिर्दीच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट होते.









