मुंबई :
ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठी कंपनी अशोक लेलँडने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पहिल्या तिमाहीत भरभक्कम निव्वळ नफा प्राप्त केला आहे. कंपनीने सदरच्या एप्रिल ते जून कालावधीत 25 पट अधिक 584 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला असल्याची माहिती आहे. कंपनीचा महसूलही सदरच्या कालावधीत 14 टक्के वाढीसह 9 हजार 691 कोटी रुपयांवर पोहचला आहे. याआधीच्या वर्षात याच अवधीत 8 हजार 470 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने कमावला होता.









