ऑनलाईन टीम / तरुण भारत :
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करतील, असे भाकीत शिवसेना शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यांनी केले आहे.
शिरसाट म्हणाले, अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून कानावर येत होत्या. पण माझी खात्री आहे की, ते लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात जातील. कारण काँग्रेसमध्ये एकवाक्यता राहिली नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी त्यांचे पटत नाही. चव्हाण यांना काँग्रेसमध्ये नीट वागणूक मिळत नसल्याचे दिसते. नांदेड जिह्यातील एकंदरीत वातावरण पाहून आता आपण काँग्रेससोबत राहू नये, अशी त्यांची मानसिकता असेल, असे मला वाटते.
मागील काही दिवसांपासून ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यावरुन चव्हाण हे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात जातील, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा : मोदींची डिग्री नव्या संसदेच्या प्रवेशद्वारावर लावायला हवी








