यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यात भाजपने किती तोडफोड केली आहे पहा. घोषणा झाल्या पण प्रत्यक्ष अंमलबजावणी कुठं आहे.सगळ्यात जास्त निधीच्या घोषणा या सरकारने केल्या.पण ग्राऊंडवर मात्र नागरिकांना काही मिळताना दिसत नाही.तोडफोड करून उमेदवार देतात आणि घराणेशाही नाही असं म्हणतात, असा टोलाही लगावला.
मागच्या मंत्रिमंडळात अजितदादा उपमुख्यमंत्री होते, मी देखील मंत्रिमंडळात होतो.मराठा आरक्षणाबाबत आता मुंबईत बैठक घेऊन उपयोग नाही.दादांना देखील कायदा कळतो, केंद्राने आता निर्णय घ्यायला पाहिजे.केंद्र सरकारने त्यावेळी राज्याचे हातपाय बांधून टाकले होते. एकनाथ शिंदे आणि आमची भूमिका होती. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे.
फडणवीस सरकारच्या काळात जो निर्णय झाला तो केवळ नागरिकांची दिशाभूल होती.आता 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे. मराठा ओबीसी यांच्यात वाद होऊ शकतो, पण असे वाद होऊ नये अशी माझी इच्छा आहे. आमची 1 तारखेला इंडिया ची बैठक मुंबईत आहे,असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय घडतं हे त्यांचा अंर्तगत प्रश्न आहे. त्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशी आमची मागणी आहे.राष्ट्रवादी काँग्रेस मधील वातावरणामुळे संभ्रमाचे वातावरण तयार झालं आहे.पवार साहेब यांनी याबद्दल अधिक स्पष्टता करणं गरजेचं आहे.भिडेंबद्दल बोलून त्यांना मोठं करणं ही आमची इच्छा नाही. त्यांच्या विधानामुळे सरकारने तातडीने अटक करून कारवाई करावी भाजप नेहमी म्हणत आहे की आम्ही त्यांच्याशी सहमत नाहीपण भाजप त्यांच्यावर कारवाई न करता मौन धरून आहे.
कोल्हापूरची लोकसभेची जागा काँग्रेसने लढावी ही माझी इच्छा.कारण याठिकाणी आम्हाला चांगलं वातावरण आहे. खूप वर्षांपासून इथं काँग्रेसला चांगलं वातावरण आहे.राज्यात शिक्षकांच्या खूप मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत.डॉक्टर नाही, अनेक विभागात कर्मचारी नाही पण हे सरकार रिक्त जागा भरत नाही.हे सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाही.या सरकारला लोकसभा आणि विधानसभा यावर परिणाम होईल अशी भीती आहे.त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा झाल्याशिवाय या निवडणुका घेतात की नाही याबद्दल शंका असल्याचेही ते म्हणाले.