ऑनलाईन टीम/तरुण भारत
वेदांता -फॉक्सकॉन प्रकल्प (vedanta-foxconn product) गुजरातला (Gujarat) गेल्यानंतर राज्यात राजकारण तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fdnavis) यांच्यामुळेच प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका विरोधकांनी केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी यासाठी महाविकास आघाडी सरकारलाच जबाबदार धरलं आहे. या प्रकल्पावरून शेलारांनी काही सवाल उपस्थित केलेलं आहेत. वेदान्त कंपनीकडे किती टक्के मागितले? असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला विचारला आहे.
विरोधकांनी वेदांता -फॉक्सकॉन प्रकल्प सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे गुजरातला गेल्याचा आरोप केल्यांनतर आता आशिष शेलार यांनी वेदांता प्रकल्पावरून २ ट्वीट केले आहेत. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात उद्योगांना असलेल्या वीज आणि विविध सवलती आणि अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी १०% लाच द्यावी लागत होती. इतका भ्रष्टाचार बोकाळला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केल्याची आठवण शेलार यांनी करून दिली.
तर दुसऱ्या ट्वीटमध्ये ‘वेदांता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प होता, मग इथे किती टक्के मागितले होते? १० टक्के नुसारच हिशेब मागितला जात होता की महापालिकेतील रेटने मागणी होत होती? सब गोलमाल है! चौकशी झाली पाहिजे… जनतेसमोर सत्य यायलाच हवे’. असे मत ट्विटच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी व्यक्त केलं आहे.
हे ही वाचा : काँग्रेसच्या प्रयत्नांमुळं चित्ते भारतात; बाळासाहेब थोरातांनी ट्विट करत सांगितला घटनाक्रम