Aashish Shelar On Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी एका समाजाचा अपमान आणि बदनामी केली. हा समाज न्यायलयात गेल्यावर न्यायलायने त्यांना शिक्षा दिली. शिक्षा दिलेल्यांच्या बाजूने काँग्रेस आंदोलन करतंय. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे. भारताची बदनामी विदेशात करणाऱ्या राहुल गांधीनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी करत काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी एका समाजाचा अपमान आणि बदनामी केल्यामुळे त्यांना शिक्षा झाली आहे. काँग्रेस आक्रमक होण्याचे कारण काय? काँग्रेसचे नेते भानावर आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. आज ते कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत होते.
सामनातील लेखावरुन टीका करताना ते म्हणाले की, ज्या बौद्धिक पातळीवरून लेख येतात ते गांजा, चिलीम किंवा वेड लागलेला माणूस लिहतो. त्यामुळे सामनाचे लेख गांजा आणि चिलीम ओढून लिहणाऱ्या माणसाशी तुलना करण्यासारखे असताता अशी तुलना शेलार यांनी केली.
मालेगाव सभेवरून बोलताना शेलार म्हणाले की,पक्ष गेला,चिन्ह गेलं,साथीदार गेले,मंत्री गेले.आता दारोदारी फिरतायेत तर फिरू देत. सभागृहात मुख्यमंत्री बुके-खोके चिडवणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या सदस्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.
बच्च्यु कडू यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, आपला पकडला गेल्यावर दुसऱ्याचा पकडला जावा ही मागणी पश्चात बुद्धी आहे.
त्या पश्चात बुद्धीने केलेल्या मागणीला कायदेशीर अधिष्ठान आहे का? असा टोलाही लगावला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








