Vedanta & Foxconn : आता खोटं सहन करणार नाही. मविआने प्रकल्पाला परवानगी दिली होती का? प्रकल्प महाराष्ट्रात कधी होता? प्रकल्प गुजरातने नेला हे कशाच्य़ा आधारे बोलत आहात. करारनामा दाखवा असे आव्हान भाजप नेते आशिष शेलार यांनी केले. उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणीही आशिष शेलार यांनी केली आहे. फाॅक्सकाॅनवरून शेलारांनी मविआवर पलटवार केला. आज मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्राला या प्रकल्पाचा काय उपयोग होणार आहे असे तत्कालीन मंत्री सुभाष देसाई म्हणाले होते. कट कमिशनमुळे फाॅक्सकाॅन प्रकल्प न आल्याचा संशय आहे. याची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी करावी आणि सत्य बाहेर आणावं अशी विनंती शेलारांनी केली. खोटं बोलणारे उघडे पडले पाहिजेत असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, वस्तुस्थिती पाहता असे मोठे प्रकल्प आपल्या राज्यात असावेत म्हणून प्रत्येक राज्य प्रयत्न करते. २०१४ पासून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करत होतो , करत आहोत. भारतात अशा मोठ्या प्रकल्पाचा जन्म होतोय याचे संपूर्ण यश मोदी सरकारचं आहे. कोरोनाकाळात सेमीकडंक्टरचा तुटवडा पडला. चीन आणि तैवानमध्ये निर्मिती होते. मात्र आपल्याला पुरवढा कमी पडला तर काय करावे असा प्रश्न भारताला पडला. यामुळे मोदी सरकार परावलंबन कमी करतयं असंही ते म्हणाले. याकूब प्रकरण लपवण्यासाठी फाॅक्सकाॅनचा मुद्दा मविआने समोर आणला आहे अशी टिका शेलार यांनी केली आहे.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








