शिवसेना पक्षाच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता या शिंदे गटाच्या ताब्यात द्याव्यात अशी याचिका फेटाळून याचिकाकर्त्यांला सुप्रिम कोर्टाने फटकारले आहे. कोणताही विलंब न लावता हि याचिका फेटाळताना त्यांनी याचिकाकर्त्या तुम्ही कोण ? असा प्रश्न करून चांगलेच झापले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या ताब्यात असलेल्या शिवसेना भवनसह इतर शाखा व मालमत्तांवर शिंदे गटाचा दावा सांगणारी याचिका अशिष गिरी या वकिलाने याचिका दाखल केली होती. अशा प्रकारची याचिका क्षणाचाही विलंब न लावता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून तुम्ही याचिका करणारे कोण?, असा थेट सवाल करत कोर्टानं याचिकाकर्त्याला केला आहे.
शिवसेनेतील बंडाळीनंतर दोन गट पडले. त्यानंतर चाललेल्या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांच्यासोबत अर्ध्याहून अधिक आमदार व खासदार गेले. त्यानंतर मूळ पक्ष कुणाचा याचा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यावर आयोगाने हा निकाल एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात टाकला. निवडणूक आयोगानं मूळ पक्षाचं नाव व चिन्ह हे लोकप्रतिनिधींची संख्या व अन्य बाबींच्या आधारावर एकनाथ शिंदेंच्य़ा बाजूला हा निकाल दिला.
दरम्यान, शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालय व शिवसेनेच्या राज्यभरातील शाखांवर ताबा कुणाचा हा प्रश्न उभा राहीला होता. या गोष्टीमुळे राज्यभरात मात्र राजकिय तणाव वाढला होता. दरम्यान, आम्ही शिवसेना भवनवर दावा सांगणार नसल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केले होते.
मुंबईतील वकील आशिष गिरी यांनी एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यात त्यांनी ठाकरे गटाच्या ताब्यातील सर्व स्थावर, जंगम मालमत्ता व पक्ष निधी शिंदे गटाला देण्याची मागणी केली होती. मात्र ही याचिका ताबडतोब फेटाळून आपण कोण अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.








