एकादशीचा उपवास सोडू वाघाटीच्या भाजीने
कोल्हापूर: सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये निसर्गाच्या सानिध्यात वाढणाऱ्या काही विशिष्ट रानभाज्या आहेत, त्यातील एक महत्वाची भाजी म्हणजे वाघाटीची भाजी. संस्कृतमध्ये तिला व्याघ्रनखी असेही म्हटले जाते.
एकादशीचा उपवास सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाघाटी फळांची भाजी करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे.
वाघाटी म्हणजे तिला बोलीभाषेत गोविंदी ‘गोविंदफळ’ किंवा शास्त्रीय भाषेत ‘कॅपेरिस होलेनिका’ या नावानेही ओळखली जाते.
वाघाटी म्हणजे तिला बोलीभाषेत गोविंदी ‘गोविंदफळ’ किंवा शास्त्रीय भाषेत ‘कॅपेरिस होलेनिका’ या नावानेही ओळखली जाते.
या एकादशीचा उपवास सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाघाटी फळांची भाजी करण्याची महाराष्ट्रातील भागात परंपराआहे. उपवासानंतर ही भाजी खाल्याने शरीराला ताकद मिळते, पचनशक्ती आणि थकवा दूर होतो.
वाघाटीचा वेल काटेरी असून त्याला उभयलिंगी आणि गुलाबी रंगाची फुले येतात. ज्यामध्ये शरीरासाठी उपयुक्त अनेक खनिज घटक असतात.औषधी गुणधर्माची खाण वाघाटीची भाजी ही केवळ चविष्ट नसून तिचे औषधी गुणही उल्लेखनीय आहेत.
वाघाटीचे वैशिष्टे
ही भाजी खाल्याने शरीरातील ताप, वेदनाशामक, दाहशामक कमी करते. शरीरासाठी ही भाजी रोगप्रतिकारक औषध म्हणून काम करते. विशेषतः क्षयरोगावर ही भाजी फायदेशीर ठरते. थायरॉइडच्या कार्यात बिघाड झाल्यास वाघाठीच्या सेवनाने फायदा होतो.

सण, संस्कृती आणि आरोग्य यांचा त्रिवेणी संगम
आजच्या धकाधकीच्या जीवनात अशी पारंपरिक रानभाजी घराचरात पोहोचणे गरजेचे आहे. आषाढी एकादशीच्या निमिताने वाघाटीसारख्या रानभाज्याची परंपरा पुढे नेल्यास आपल्या आरोग्याला आणि पर्यावरणाला दोन्हीला लाभ होतो.
एकादशीचा उपवास सोडू वाघाटीच्या भाजीने
शरीरासाठी उपयोगी असणारी पारंपरिक फळभाजी चव आणि पोषण यांचा सुंदर संगम आहे. ही भाजी चविष्ट असून शरीराला आवश्यक पोषणद्रव्याची पूर्तता करते. विशेषतः पावसाळ्यात ही भाजी खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, जंत व अपचन दूर होते.